Useful Tools for Business operation ( Marathi)
मला नेहमी माझ्या व्यावसायिक मित्रांकडून विचारणा होते, "सागर सर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये असे कोणते ॲप्स आणि टूल्स वापरता ज्यामुळे तुमचे काम सोपे होते". त्याचीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. खालील लेख नक्की वाचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. १) Google docs - व्यवसाय करताना आपल्याला विविध प्रकारचे डॉक्युमेंट लिहायचे असतात त्यामध्ये एखादा बिल बनवणे असो किंवा महत्वाची माहिती अथवा एखादा लेख आपण यासाठी गूगल डॉक्स या गूगलच्या टूल्सचा वापर करू शकतो. गूगलचे वेगवेगळे एप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये डॉक्युमेंटसाठी Google Docs, गणिती आकडेमोड आणि इतर माहितीसाठी Google Sheet (Microsoft Excel सारखे आहे ) आणि Presentation साठी Google Slide चा वापर आपण करू शकतो. हे सर्व ऑनलाईन स्टोर होते याला आपण एडिट ही करू शकतो तसेच शेअर ही करू शकतो. २) ChatGpt - ChatGpt हा Open Ai या कंपनीने डेव्हलप केलेला Chatbot आहे. याचे फ्री आणि पेड व्हर्जन सध्या उपलब्ध आहे, आणि महत्वाचे म्हणजे याला तुम्ही मराठी भाषेमध्ये पण वापरू शकता, यामध्ये २०२१ पर्यंतची माहिती यामध्ये आहे. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्ती...