टॅगलाइनची ट्रेडमार्क नोंदणी झाली

गणपती बाप्पा मोरया 🚩🙏 आज आपणास सांगताना अत्यंत आनंद होत आहे आपल्या कंपनीची टॅगलाइन (व्यवसायाचे घोषवाक्य) " Change Your Comfort Path"® ( तुमचा आरामाचा मार्ग बदला) ची यशस्वीरित्या ट्रेडमार्क ® नोंदणी झाली. गेल्या डिसेंबर मध्ये आपण ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. कधी कधी चमत्कार होतात आणि त्याची उकल होत नाही, त्याच उत्तम उदाहरण म्हणजे ही ट्रेडमार्क नोंदणी काल अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पा ही गोड भेट त्याला निरोप देता देता देऊन गेला. माझ्या आयुष्यातील ही दुसरी ट्रेडमार्क नोंदणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली पहिल माझ व्यवसायाच ब्रॅण्ड नाव " BreakComfort ®" १९ जुलै 2021 ला रजिस्टर झाल आणि आत्ता ही व्यवसायाची टॅगलाईन, तुमच्या व्यवसायाला कशासाठी ओळखल जाव हे तुमची टॅगलाइन एका ओळीत स्पष्ट करते. कोणत्याही टॅगलाइनचे उद्दिष्ट ग्राहकाला ब्रँडचा मुख्य संदेश देणे हे आहे आणि त्यामुळे ती मुख्य कल्पना लोकांच्या सदैव स्मरणात राहते. टॅगलाइन महत्वाची आहे कारण ती तुमच्या संभाव्य ग्राहकाचे लक्ष वेधून घेते. जेव्हा ग्राहक तुमची टॅगलाइन वाचतात, ऐकतात तेव्हा त्यां...