हिरोजी इंदुलकर
निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे शब्द सहसा ऐकायला मिळत नाहीत. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने करणारी फार कमी लोक असतात त्यातील एक नाव म्हणजे स्वराज्यातील स्थापत्य अभियंता " हिरोजी इंदुलकर" , स्वराज्याची राजधानी रायगड बांधणीचे काम त्यांच्याकडे होते. स्वराज्याच्या या कार्यात शिवरायांची अनुपस्थिती असताना त्यांनी प्रसंगी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केले. सन १६७४ मध्ये रायगडावर जेव्हा राज्याभिषेक सोहळा सुरू होता तेव्हा महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना विचारणा केली "हिरोजी मागा आज आपणास काय हवे " त्या जागी दुसरी कोणती व्यक्ती असती तर त्याने नक्कीच त्याच्या फायद्याचे मागितले असते. पण या निष्ठावंत मावळ्याने महाराजांना एकच उत्तर दिले आणि ते शब्द इतिहासामध्ये कायमचे सोनेरी अक्षराने कोरले गेले " महाराज मला काही नको तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर जगदीश्वराच्या दर्शनाला जाल तेव्हा आपल्या चरणांची धूळ माझ्या नावावर पडली पाहिजे" म्हणजे लोकहो मागितल काय तर फक्त एक पायरी , अशी निष्ठा, निस्वार्थी भावना, आपल्या मालकाबद्दल आणि त्या संस्थेबद्दल असलेली समर्पक वृत्ती कोठे पहावयास मिळेल हीच निस्वार्थी निष्ठा , समर्पक वृत्ती आपण हिरोजी इंदुलकर यांच्याकडून घेऊ शकतो. आजही त्या पायरीवर ठसठशीत पणे लिहिले आहे, " सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर" धन्य तो महान राजा आणि धन्य तो त्याचा महान सेवक. - सागर शेडगे ( CEO & FOUNDER - Breakcomfort ® Business Registration Services
Comments
Post a Comment