स्वराज्य स्थापना

 सन १३१८ मध्ये महाराष्ट्रातील यादवांचे राज्य नष्ट झाले आणि पारतंत्र्याचा सूर्य उदयास आला आणि पुढील ३१२ वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होई पर्यंत तो सूर्य अस्ताला जाईल आणि स्वातंत्र्याची अनुभूती होईल अशी अंधुकशी आशा देखील नव्हती. तो पर्यंत अनन्वित अत्याचार लोकांवर होत होते. आपल्या राज्यात आपणच परके झाले होतो मुघल, आदिलशाही, निजामशाही , सिद्धी, फ्रेंच, इंग्रज यांच्या सत्ताओढीच्या राजकारणात सामान्य माणूस होरपळून निघत होता. दिवसाढवळ्या स्त्रियांवर अमानुष अत्याचार अपहरण होत होते, शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस होत होती, अवाच्या सव्वा कर भरून शेतकरी हवालदिल झाला होता. अत्याचार फक्त परकीय सत्तांकडून नव्हे तर परकियांची चाकरी करणाऱ्या स्वकियांनकडून पण होत होता. याचा अस्त होण्याची सुरवात झाली सन १६४५ ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या निवडक सवंगड्यान सोबत रायेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा झाली, त्यानंतर दोनच वर्षात महाराजांनी १६४७ मध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, का गरज होती स्वराज्याची सुरक्षा, पिळवणूक,अत्याचार , आर्थिक सुबत्ता या ना अनेक सर्वच बाबतीत एक स्थैर्य याव आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याची अनुभूती यावी त्याला वाटाव हे माझं राज्य आहे. महाराज परकीय सत्तांनविरोधात तर लढलेच पण जे स्वकीय होते ज्यांची मानसिकता फक्त गुलामीची होती त्यांच्यावर कोणाचा वचक नव्हता अश्या लोकांचा पण बंदोबस्त केला , पूर्वानपार चालत आलेली वतनदारी नष्ट केली, शेतीचा शेतसारा निश्र्चित करण्याची योग्य पद्धत आणली,न्याय व्यवस्था बळकट केली अत्याचार करणाऱ्या लोकांवर कडक असे शासन केले, पिकांना योग्य तो हमीभाव दिला , रयतेच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे असा सैन्याला आदेश होता यावरून आपण समजू शकतो महाराजांचा प्रशासनावर अंकुश कसा होता .स्वराज्य म्हणजे परकीय सत्तान विरोधात फक्त लढा देणे आणि विजयी होणे आपली सत्ता स्थापन करणे नव्हे तर प्रशासनामध्ये पण पारदर्शकता आणणे आणि स्वराज्य खऱ्या अर्थाने सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे होय, आणि तो दिवस उजाडला १६४५ ला सुरू केलेला स्वराज्याचा अग्निकुंड आपल्या परमोच्च क्षणी म्हणजे दिनांक ६ जुन १६७४ ला एका वेगळ्या बिंदूवर गेला आणि रायगडावर मराठ्यांचा राजा छत्रपती झाला. महाराष्ट्रावरील पारतंत्र्याचा सूर्य अस्ताला गेला आणि ३५० वर्षांचा अंधकार एका क्षणात नाहीसा झाला, आणि स्वराज्याची खऱ्या अर्थाने पालवी फुटली.- सागर शेडगे ( CEO & FOUNDER - Breakcomfort ® Business Registration Services 

Comments

Popular posts from this blog

Gazette for After Marriage Name change

महात्मा फुले उद्योजक

हिरोजी इंदुलकर