शिवराय आणि स्त्रीदाक्षिण्य

 कोणत्याही समाजाची प्रगती किती झाली आहे, याच आकलन त्या समाजातील स्त्रियांचे त्या समाजात किती स्थान आहे, त्यांचा किती आदर राखला जातो यावरून अंदाज लावला जातो. स्वराज्यामध्ये स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते, महिलांवर अत्याचार, अन्याय करणाऱ्यांची गय केली जात नसे कठोर अशी शिक्षा केली जात असे. सन १६४६ च वर्ष असेल शिवाजी महाराज फक्त १६ वर्षाचे होते , स्थानिक कुलकर्णी याचाकडून महाराजांकडे एक पत्र येते रांजे गावचा पाटील बाबाजी गुजर याने एका गरीब घरातील पोरगी बाटवली हे कळताच त्याला महाराजांसमोर हजर करण्यात आले व त्याची पाटीलकी जप्त करून त्याचा चौरंग करण्याचा आदेश देण्यात आला. मोगली फौजेतील रायबाघीन हिचा

 उंबरखिंडीच्या लढाईत महाराजांच्या विरोधात लढताना पराभव झाला तेव्हा ती पकडली गेली तेव्हा तिला तिच्या हुद्या नुसार योग्य ती सन्मानाची वागणूक देऊन तिचा आदर सत्कार करून तिला सुखरूप तिच्या छावणीत पोहचवले. महाराज दक्षिण दिग्विजय करून परतत असताना कर्नाटकातील बेलवडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई महाराजांच्या विरोधात लढल्या त्यावेळी त्या स्त्रीचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली यावरून शिवरायांचे स्त्रियांविषयक धोरण दिसून येते. त्यांचे सैन्याला सक्त आदेश होते आपल्या शत्रू पक्षातील स्त्रीचा आदर , सन्मान राखला जावा आणि त्यांचे संरक्षण केले जावे. सखोजी गायकवाड म्हणजे शिवरायांचे मेव्हणे त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम करत असताना शत्रुपक्षातील स्त्री सैन्यास डांबून ठेवले व थपडा मारून सोडून दिले जेव्हा महाराजांना ही गोष्ट समजली त्यांनी लगेच सैन्याला आदेश दिला सखोजी यांचे "तापलेल्या सळईने डोळे काढले जावेत " त्यांनी या प्रसंगात कोणतही नात आणलं नाही. जिजाऊ माँ साहेब जेव्हा सती जायला निघाल्या होत्या तेव्हा ३५९ वर्षांपुरवी त्यांना परावृत्त करणारे शिवराय होते त्याकाळात ती एक सामाजिक क्रांतीच होती. आपल्या सूनबाई येसूबाई साहेब यांना प्रशासनामधे अत्यंत मानाचे असे कुलमुखत्यार पद दिले व त्यांना कुलमुखत्यार पदाची शिक्के, कट्यार प्रदान केली होती. मोगल इतिहासकार काफिखान लिहितो " भाऊ जसा बहिणीशी बोलतो, मुलगा जसा आईशी बोलतो तसे शिवाजी महाराज अगदी गरीब आणि श्रीमंत स्त्रियांशी वागतात". यावरून आपण समजू शकतो शत्रू देखील ज्या राजाचा इतका आदर करतात त्यांना विश्वास आहे ,त्या नीतिमान राजाबद्दल एवढेच बोलता येईल असा नैतिक मुल्य असणारा राजा होणे नाही. - सागर शेडगे ( CEO & FOUNDER - Breakcomfort ® Business Registration Services 

Comments

Popular posts from this blog

टॅगलाइनची ट्रेडमार्क नोंदणी झाली

Gazette for After Marriage Name change

ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी ब्रॅंड चे नाव कसे निवडावे?