Useful Tools for Business operation ( Marathi)
मला नेहमी माझ्या व्यावसायिक मित्रांकडून विचारणा होते, "सागर सर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये असे कोणते ॲप्स आणि टूल्स वापरता ज्यामुळे तुमचे काम सोपे होते". त्याचीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. खालील लेख नक्की वाचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
१) Google docs - व्यवसाय करताना आपल्याला विविध प्रकारचे डॉक्युमेंट लिहायचे असतात त्यामध्ये एखादा बिल बनवणे असो किंवा महत्वाची माहिती अथवा एखादा लेख आपण यासाठी गूगल डॉक्स या गूगलच्या टूल्सचा वापर करू शकतो. गूगलचे वेगवेगळे एप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये डॉक्युमेंटसाठी Google Docs, गणिती आकडेमोड आणि इतर माहितीसाठी Google Sheet (Microsoft Excel सारखे आहे ) आणि Presentation साठी Google Slide चा वापर आपण करू शकतो. हे सर्व ऑनलाईन स्टोर होते याला आपण एडिट ही करू शकतो तसेच शेअर ही करू शकतो.
२) ChatGpt - ChatGpt हा Open Ai या कंपनीने डेव्हलप केलेला Chatbot आहे. याचे फ्री आणि पेड व्हर्जन सध्या उपलब्ध आहे, आणि महत्वाचे म्हणजे याला तुम्ही मराठी भाषेमध्ये पण वापरू शकता, यामध्ये २०२१ पर्यंतची माहिती यामध्ये आहे. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मेल करायचा आहे किंवा कोणता तरी लेख लिहायचा आहे तेव्हा तुम्ही ChatGpt ला ठराविक शब्दांमध्ये Prompt ( Command) दिला म्हणजे मला मेल कसा हवा त्यामध्ये काय समाविष्ट असले पाहिजे ही माहिती टाइप करून त्याला विचारू शकता तो अगदी तसा मेल किंवा तुम्ही जी माहिती दिली त्याचे उत्तर तयार करून देईल. आनंदाची गोष्ट म्हणजे ChatGpt ने Android app हल्लीच Playstore वर Launch केले आहे मी खुप त्याचा वापर करतो तुम्हीही करू शकता.
३) Google Drive - Google Drive हे आपल्याला ऑनलाइन स्टोरेज प्रदान करते, ज्याचा वापर करून आपण आपल्या डॉक्युमेंट्स, इमेजेस, व्हिडिओसारख्या फाइल्स संग्रहित करू शकतो.
4) Duolingo- Duolingo या ॲपचा वापर करून आपण विविध भाषा शिकू शकतो. दररोज आपण नाहक किती तरी वेळ वाया घालवतो वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स, व्हिडिओ पाहून किंवा गेम्स खेळून वेळ वाया जातो. आजकालच्या युगात इंग्लिश येणे फार महत्वाचे झाले आहे आपण १५ ते ३० मिनिट्स एवढा वेळ देऊन या ॲप मार्फत इंग्रजी अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकतो.
5) InShot: InShot हे व्हिडिओ एडिटिंग साठी एक अॅप आहे. आपल्याला व्हिडिओस एडिट करण्यासाठी महत्वाचे ॲप आहे, ज्यामध्ये हे ॲप स्लाइडशो, म्युझिक वापरण्याची संधी देते.
6) Google Keep Notes - या अॅपच्या माध्यमातून आपण नोट्स तयार करू शकतो. आज कोणती कामे करायची आहेत त्याची To Do List किंवा तुम्हाला एखादी माहिती , लेख किंवा अचानक कोणती तरी कल्पना ,नाव आपणास सुचते ते आपण नोट्स मध्ये लिहू शकतो आणि त्याला सब्जेक्ट देऊन आपण माहिती सेव्ह करू शकतो.
7) Oken Scanner - Oken Scanner चा वापर करून आपण वेगेवगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करू शकतो.
8) LinkedIn: LinkedIn हे व्यावसायिक संपर्क साधण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी मुख्य:त वापरले जाते. LinkedIn चा वापर विविध क्षेत्रातील व्यावसायिक ( Professionals) लोक करतात. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठीं LinkedIn चा फार वापर होतो.
9) PixelLab - PixelLab App चा वापर करून आपण विविध प्रकारच्या ग्राफिक्स बनवू शकतो आणि त्याचा वापर सोशल मीडिया अकाउंट वर करू शकतो.
10) VN: VN App चा वापर व्हिडिओ एडिटिंग साठी आपण करू शकतो म त्यामध्ये Instagram Videos, Facebook Video, YouTube video असो याचा फार चांगला वापर होऊ शकतो.
11) Canva: Canva हे विविध प्रकारच्या डिजाइन्स, पोस्टर्स, स्लाइड्स, सोशल मिडिया पोस्ट्ससाठी वापरला जातो. त्याच्या मदतीने आपल्या डिजाइन्स किंवा पोस्टर बनवू शकतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला लाईक आणि फॉलो करा.
आमच्या विषयी अधिक माहितीसाठी फक्त गूगल ला सर्च करा Breakcomfort ® Business Registration Services.
© 2023 Sagar Shedge All Right Reserved
These Contents are Subjected to COPYRIGHT ©️ . Violation of the same will Result Into Legal Action Indian Copyright ©️ Act 1957
📞Sagar Shedge (CEO & Founder)- 9867008910
Email ✉️- ceo@breakcomfort.com
Address - Breakcomfort ® Business Registration Services, 125, Ajinkyatara Welfare Society, Kranti Nagar, Nr lokhandwala complex, Kandivali East, Mumbai - 400101.
🌐www.breakcomfort.com
Service all over India 🇮🇳
Comments
Post a Comment