ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी ब्रॅंड चे नाव कसे निवडावे?

१) तो जर शब्द असेल तर शब्दलेखन करणे, बोलणे आणि लक्षात ठेवणे सोपे आहे असा शब्द निवडा.

२) सर्वोत्कृष्ट ट्रेडमार्क म्हणजे नवीन बनवलेला शब्द, असा शब्द जो प्रथमच: उच्चारलेला गेला आहे. जस आविष्कृत शब्द असे शब्द आहेत, जे तुमच्या ट्रेडमार्क व्यतिरिक्त कोणत्याही भाषेत अस्तित्वात नाहीत. उदाहरणांमध्ये SPANDEX, EXXON, KODAK, VIAGRA, BREAKCOMFORT, OPLUS, HUNAAR, RAGDOLL, DIN SQUARE, KALPMEY, HOUSE OF SHAAROM, TERTHKSHETRA, DELL, FACEBOOK, GOOGLE दोन वेगळ्या शब्दांना एकत्र जोडून एक अर्थ निघेल त्याचा असा शब्द बनवा जो तुमच्या व्यवसायाच प्रतिनिधित्व करेल ओळख दाखवेल. आविष्कृत शब्द हा एक चांगला पर्याय आहे कारण ते अगदी विशिष्ट असतात. तुम्ही फक्त इतर शब्दांचे भाग एकत्र करून एक आविष्कृत शब्द तयार करू शकता. उदाहरणार्थ, MICROSOFT हे “Micro computer” आणि “software” चे संयोजन आहे किंवा अद्वितीय भौमितिक रचना (UNIQUE LOGO) जे तुमच्या ब्रँडची एक वेगळी ओळख निर्माण करतो.


३)कृपया भौगोलिक नाव, सामान्य वैयक्तिक नाव किंवा आडनाव निवडणे टाळा, त्यावर कोणाची मक्तेदारी असू शकत नाही. जसे INDIA , MARATHI, HINDI, MAHARASHTRA, SAHAYADRI, HIMALAY, PUNE, MORE, SHEDGE, JADHAV, PATIL, DESHMUKH etc.

४) वस्तुच्या गुणवत्तेचे वर्णन करणारे (जसे की BEST, SUPER, PERFECT, SIMPLE इ.) प्रशंसा करणारे शब्द वापरणे टाळा.

५) धार्मिक नाव कोणत्याही समाजाच्या, समुदायाच्या भावना दुखावणारे नाव टाळावे.

६) आपण करत असलेल्या व्यवसायाच्या क्षेत्रातील स्पर्धक कंपनीच्या नावाशी मिळतेजुळते नाव ( साधर्म्य) असणार नाव उच्चार काहीसा समान असलेल नाव किंवा मिळताजुळता लोगो चालत नाही.

टीप: बाजारात समान शब्द किंवा समान चिन्ह वापरले आहे की नाही हे तपासण्यासाठी बाजार सर्वेक्षण ( MARKET SURVEY) करणे उचित आहे. 

नावात काय आहे, पण नावातच सर्व काही आहे. आपली ओळख ही आपल्या नावामुळे आहे, आपली विश्वासार्हता आपल्या नावामुळे आहे. कोणीही आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतो काही मागणी करतो किंवा खरेदी करतो हे आपल्या समाजात असलेल्या नावामुळे करतो,असे नावाचे महत्व आहे.

अहो पण तुम्ही जो ही व्यवसाय करत आहात किंवा सुरू करणार आहात त्याचे नावच कोणी चोरले, तुमची परवानगी न घेता वापरले ,जे तुमच्या व्यवसायाचे नाव आहे अगदी तसेच नाव स्पर्धक कंपनीचे असेल तर येणाऱ्या ग्राहकाला कसे समजेल जी आपण सेवा देत आहात अथवा वस्तू विकत आहात ती तुमच्या कंपनीची आहे, म्हणून नाव सुरक्षित करायला हवे ना, असे नाही केले तर आपले किती नुकसान होईल प्रतिष्ठा धुळीस मिळेल, जी आज पर्यंत कमावली आहे , सर्वच व्यर्थ होईल.

आम्ही गेल्या काही वर्षांपासून Trademark ™️® Registration ही सेवा पूर्ण भारतभर देत आहोत. आम्हाला हे जाणवल की ब्रँड ™® नोंदणी विषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत , ब्रँड नाव कसे असावे याबद्दल फार शंका आहेत, प्रश्न आहेत, गोंधळलेली संभ्रम स्थिती आहे. म्हणूनच या पोस्ट मध्ये आम्ही २ ग्राफिक्स जोडले आहेत त्या मध्ये ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी ब्रॅंड चे नाव कसे निवडावे या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती आपण नक्की वाचा आपल्याला असलेले बरेच प्रश्न दूर होतील. ट्रेडमार्क नोंदणी ™® चे आमचे असे बरेच लेख आहेत. आपण आमच्या व्हॉट्सॲप नंबर ला Trademark Registration ™® Information in Marathi अस टाईप करुन पाठवा आम्ही आपणास ते लेख पाठवू व आपणास आपल्या ब्रँडची ट्रेडमार्क ™® नोंदणी करायची असल्यास आम्हाला आजच संपर्क करा.

© 2022 Sagar Shedge All Right Reserved
These Contents are Subjected to COPYRIGHT ©️ . Violation of the same will Result Into Legal Action Indian Copyright ©️ Act 1957

सागर शेडगे ( Founder and CEO Breakcomfort ® Business Registration Services)

Contact 📞 9867008910

Comments

Popular posts from this blog

टॅगलाइनची ट्रेडमार्क नोंदणी झाली

Gazette for After Marriage Name change