महात्मा फुले उद्योजक

महात्मा जोतिबा फुले एक उद्योजक (First Entrepreneur in Maharashtra) अज्ञात पैलू...
१) उद्योजक महात्मा फुले- 
फार कमी जणांना ठावूक आहे, महात्मा फुले एक बांधकाम व्यावसायिक होते त्यांची The Puna Commercial and  Contracting Company नावाची कंपनी होती पुण्यात जी कामगार पुरवणे, बांधकाम साहित्य पुरवठा करणे, नवीन बांधकाम करणे पुल, इमारत, रस्ते, उद्यान, धरण, कालवे , कापडगिरण्याअशी काम करायची. 

महात्मा फुले यांच्या कंपनीने पुढील कामे केली :
• बंड गार्डन पुल, कात्रज बोगदा चुना  व इतर बांधकाम साहित्य पुरवणे, कामगार पुरवणे अशी Subcontractor म्हणून कामे केली, खडकवास धरण ते घोरपडे उद्यान असे कॅनाल बनवले त्या काळी साठवलेले पाणी लोक वापरात नसत महात्मा फुलेंनी हडपसर ला जमीन घेवून ते पाणी वापरले व १ यशस्वी बागायतदार झाले, मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग, मुंबई महानरपालिका इमारत, भायखळा पुल, परळ रेल्वे वर्कशॉप, भंडारदरा जलाशय, सयाजीराव गायकवाड यांच्या लक्ष्मीविलास राजवाडा याच बांधकाम त्यांच्या कंपनीने केली व तसेच त्यांचे स्नेही व भागीदार यांनी टाइम्स ऑफ इंडिया ची मुंबई मधील बिल्डिंग, सोलापूरची विष्णु मिल , लक्ष्मी दास खिमजी यांच्या कापडगिरण्या बनवल्या .
त्यांनी एका मेटल कॉस्ट इक्विपमेंट कंपनीची एजन्सी घेतली होती त्यात ते सोन्या चांदीचे दागिने यांना लागणारे साचे बनवत व भाजीपाला विक्री करणे हा ही व्यवसाय करत. त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था पण होती त्यात त्यांनी तात्या पडवळ यांनी लिहिलेले "जातीभेद विवेकसार" नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. 

महात्मा फुले एक लेखक- 
• महात्मा फुले एक चांगले लेखक होते त्यांनी आपला "गुलामगिरी" हा ग्रंथ अमेरिकेतील कृषणवर्णीय यांना समर्पित केला होता. " शेतकऱ्यांचा आसूड" हा शेतकऱ्यांच्या समस्यांवर ग्रंथ लिहिला होता त्यात त्यांनी उत्पादन आधारित बाजारभाव मिळावा, शेती सोबत जोडधंदा करावा, शेतीपूरक व्यवसाय करावे असे अनेक उपाय सुचवले होते. त्यांच्यावर "राइट्स ऑफ मँन " या पुस्तकाचा, तुकाराम गाथा,  शिवचरित्र यांचा प्रभाव होता. १८६९ साली त्यांनी पहिले शिवचरित्र लिहिले, शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिला, महात्मा फुले यांनी पाहिले आधुनिक नाटक " तृतीय रत्न" लिहिले.
रायगडावर जाऊन तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत चाफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८० साली पुण्यात आणि रायगडावर जगात सर्वप्रथम शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत.१५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते. शिवाजी मराठा शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केली. "असपृश्यांची कैफियत" हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १८९१ ला प्रकाशित केला गेला. वयाच्या ६ व्या वर्षापासून शेती, तंत्र व औद्योगिक शिक्षण मिळावे यासाठी हंटर आयोगासमोर आग्रह धरला, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे यासाठी मागणी केली. कोणत्याही व्यक्तीला ३ भाषा याव्या अस शिक्षण असावे असे विचार मांडले.नारायण लोखंडे ज्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना सुरू केली ( ज्यामुळे आज आपणास रविवारी सुट्टी भेटते) त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू प्रबोधन हे नियतकालिक सुरू केले.

महात्मा फुले राजकीय व्यक्तिमतत्व:
• महात्मा फुले १८७६ ते १८८२ पुण्याचे आयुक्त ( Municipal Commissioner) होते त्या वेळी त्यांनी शुक्रवार पेठ येथे मंडई उभी केली तिला पूर्वी मुंबई मधील तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रे याच्या नावावर रे मंडई बोलत आता तिचे नाव महात्मा फुले मंडई आहे. घरोघरी बंद पाणी नळ योजना सुरू केली.

महात्मा फुले समाजसुधारक:
सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
मुलींची पहिली शाळा सुरू केली.
विधवा बाळंतपणासाठी व बालहत्या प्रतिबंधक गृह अनाथाश्रम सुरू केले.
प्रौढ शिक्षण संस्था सुरू केली.
बहुजन समाजासाठी आपला पाण्याचा हौद खुला केला.
असे कितीतरी महान कार्य महात्मा फुले यांनी केले आज त्यांची जयंती त्यांना माझे विनम्र अभिवादन. © सागर शेडगे ( व्यावसायिक सल्लागार) BreakComfort ™ Business Registration Services ✅

Comments

Popular posts from this blog

टॅगलाइनची ट्रेडमार्क नोंदणी झाली

Gazette for After Marriage Name change

ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी ब्रॅंड चे नाव कसे निवडावे?