टॅगलाइनची ट्रेडमार्क नोंदणी झाली
गणपती बाप्पा मोरया 🚩🙏
आज आपणास सांगताना अत्यंत आनंद होत आहे आपल्या कंपनीची टॅगलाइन (व्यवसायाचे घोषवाक्य) " Change Your Comfort Path"® ( तुमचा आरामाचा मार्ग बदला) ची यशस्वीरित्या ट्रेडमार्क ® नोंदणी झाली.
गेल्या डिसेंबर मध्ये आपण ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. कधी कधी चमत्कार होतात आणि त्याची उकल होत नाही, त्याच उत्तम उदाहरण म्हणजे ही ट्रेडमार्क नोंदणी काल अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पा ही गोड भेट त्याला निरोप देता देता देऊन गेला. माझ्या आयुष्यातील ही दुसरी ट्रेडमार्क नोंदणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली पहिल माझ व्यवसायाच ब्रॅण्ड नाव " BreakComfort ®" १९ जुलै 2021 ला रजिस्टर झाल आणि आत्ता ही व्यवसायाची टॅगलाईन, तुमच्या व्यवसायाला कशासाठी ओळखल जाव हे तुमची टॅगलाइन एका ओळीत स्पष्ट करते. कोणत्याही टॅगलाइनचे उद्दिष्ट ग्राहकाला ब्रँडचा मुख्य संदेश देणे हे आहे आणि त्यामुळे ती मुख्य कल्पना लोकांच्या सदैव स्मरणात राहते.
टॅगलाइन महत्वाची आहे कारण ती तुमच्या संभाव्य ग्राहकाचे लक्ष वेधून घेते. जेव्हा ग्राहक तुमची टॅगलाइन वाचतात, ऐकतात तेव्हा त्यांना तुमच्या उत्पादनाच्या/ सर्व्हिसेसच्या फायद्यांची किंवा तो व्यवसाय कशाशी संबंधित आहे याची एक स्पष्ट कल्पना येते. तुमची टॅगलाइन तुमच्या ब्रँडला इतर प्रतिस्पर्धी कंपनीच्या उत्पादन / सेवा त्यांच्यापेक्षा वेगळ्या कशा आहेत स्पष्ट करते.
आपण व्यवसाय करतो पण त्या व्यवसायाच्या नावात नाविन्य आहे का आणि ते तुमच्या व्यवसायाच स्वरूप दर्शवत का आणि त्या तुमच्या व्यवसायाच्या / ब्रॅण्डच्या नावाचे स्वामित्व हक्क तुमच्याकडे आहेत का याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. भारतात ट्रेडमार्क ®™ , पेटंट, कॉपीराइट © या बौद्धिक संपद्ये बद्दल जागरूकता आणि अनास्था प्रचंड आहे. काही देशाची अर्थव्यवस्था काही अंशी त्या देशातील लोकांकडे असलेल्या ट्रेडमार्क ®™ , पेटंट, कॉपीराइट© च्या एकाधिकार स्वामित्व हक्कांनमुळे आहे. त्यामूळे प्रचंड आर्थिक सुबत्ता त्या देशात आहे. या विषयी अधिक माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला नक्की भेट द्या आणि आमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट जरुर फॉलो आणि लाईक करा, अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
फेसबूक पेज - BreakComfort Business Registration Services
©सागर शेडगे ( CEO &FOUNDER - BreakComfort ® Business Registration Services)
संपर्क क्रमांक - 9867008910
✉️ ईमेल - ceo@breakcomfort.com
#trademarkregistration #trademarkedtagline #registered #sagarshedge #breakcomfort #trademarkattorney #trademarklawyer #trademarklaw #india #mumbai #maharashtra
Comments
Post a Comment