माझे हॉटेल ताज महाल, मुंबई ला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले १५ वर्षांनी ........
नमस्कार मित्रांनो, आज मी कोणतीही बिझनेस मार्केटींग पोस्ट करणार नाही. आज थोड माझ्याबद्दल बोलणार आहे, मी सागर शेडगे माझ मूळ गाव सातारा जन्म ही साताऱ्यातील , सातारा जिल्ह्यातील कास पठार भागातील "आंबाणी" हे आमचे छोटेसे २०० ते २५० लोकवस्तीचे गाव अत्यंत दुर्गम डोंगर भागातील आमच्या परिसरातील लोकांना ठोस अस उत्पन्नाच साधन नसल्यामुळे आणि शेती मर्यादित पारंपारिक पध्दतीने काही ठराविक पिके गरजेपुरती घेणे आणि बाकी छोटी मोठी कामे करून साताऱ्यातून गरजेच्या वस्तू विकत घेणे हा पर्याय. त्याकाळी शिक्षण ही जास्त नसल्यामुळे लोकांचा ओढा मुंबई कडे , १९७० च्या दशकात लोकांचे स्थलांतर झाले. त्यातील आमच ही कुटुंब होत वडील सातवीला असताना दिवसा काम रात्री शाळा अस करत १० वी पर्यंत शिकले, १९९६ ला त्यांनी मुंबईच्या कांदिवली उपनगरात चाळीमध्ये खोली घेतली. त्यांचा लहानपणापासुन संघर्ष पाहत होतो.
नेहमी वाटत होत ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे, स्वप्नं नेहमी मोठी पहायचो. असच शिक्षण चालू असताना गाडी धुण्यापासून ११वी ला असताना कामाला सुरवात केली आणि एके दिवशी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई ला मित्रा सोबत भेट दिली आणि नजरेस पडले " समुद्र किनारी असलेले भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ताज महाल टॉवर " मित्राला बोललो, एक दिवशी नक्की येईन येथे बिझिनेसमेन बनून आणि नाही परवडल तर चहा तर नक्की घेईन ते वर्ष होत २००८ वर्ष जात होती, माझ बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण होऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू होती, २०१७ ला अशीच एक सी ए फर्म जॉइन केली पण आत्तापर्यंत खूप कामे केली, पण आपला व्यवसाय असावा अस नेहमी वाटायच लोकांनी आपल्याला सर बोलाव खूप चांगल्या प्रकारे लोकांची काम करावी अस मनोमन वाटत होत. त्या फर्म मध्ये खूप मनापासून आपल समजून काम करत होतो म एके दिवशी ठरवल आपला व्यवसाय सुरू करायचा कधीच नोकरी च्या मार्गाला जायच नाही. जानेवारी २०२० ला तस माझ्या वरिष्ठांना सांगितल मी काम सोडत आहे, पण व्यवसाय सुरू करणार आहे अस नाही सांगितल ते ही बोलले ठीक आहे.
१ फेब्रुवारी २०२० ला BreakComfort ® Business Registration Services ची मुंबई मध्ये सुरवात केली. व्यवसायाच्या ऑनलाईन मार्केटींग ला सुरवात केली, साहजिकपणे त्यांना मी व्यवसाय सुरू केला ही बाब त्यांना समजणार होती,त्यांना राग येण्याचे कारण नव्हते कारण मी नव्याने माझ्या व्यवसायाची सुरवात करणार होतो, त्यांना फसवल नव्हते किंवा त्यांच्या कोणत्या Clients ना काम द्या मी अत्यंत माफक दरात सर्व्हिस देतो ना अशी कधी विचारणा केली होती ना करणार होतो. मला त्यांचा कॉल आला त्यातील एक व्यक्ती बोलली तू आम्हाला न सांगता व्यवसाय सुरू केलास अस करायला नको होत आणि दुसरी व्यक्ती त्या फर्म मधील ( एक स्त्री) अत्यंत वाईट शब्दात माझ्याशी बोलत होती मी ऐकत होतो , माझी काही चुकी नसताना नंतर ती एक शब्द बोलली तू ना कर व्यवसाय "तुला फक्त गुमास्ता ( शॉप ॲक्ट ) येतो तेच कर" मला हे शब्द लागले तेव्हाच ठरवल या शब्दांचा प्रेरणे सारखा वापर करायचा आणि स्वतः ला सिद्ध करायच.
नंतर दीड महिना असाच कामासाठी संघर्ष चालू होता आणि २१ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागला सर्वच व्यवसाय ठप्प पडले काही बंद झाले , कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या , त्यामुळे पुढील काही महिने काहीच काम नाही. परत परिस्थिती पूर्वपदावर येत होती आणि केली सुरवात सप्टेंबर २०२० ला पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या फेसबुक बिझिनेस ग्रूप मधून जाहिरात करून कामे मिळवत गेलो आणि ही कामे स्वतः करू लागलो , "अगोदर काम नंतर पैसे" ही आगळीवेगळी Strategy वापरून पूर्ण महाराष्ट्र भर काम करू लागलो. माफक योग्य प्रोफेशनल फी , चांगली जलद सर्व्हिस आणि काही कामांसाठी , "अगोदर काम नंतर पैसे" ही आगळीवेगळी Strategy वापरून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काम केली, आणि हेच नाही उत्तर प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यातील लोकांची काही कामे केली. आज सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की १३५०+ वेगवेगळ्या व्यवसाय व इतर नोंदणी आपण केल्या आहेत.
शेवटी ठरवल १ फेब्रुवारी २०२३ ला BreakComfort ® Business Registration Services चा ३ रा स्थापना दिवस (३rd Founding day) हॉटेल ताज महाल, मुंबई येथे समुद्र किनारा दिसेल अशा तेथील रेस्टॉरंट मध्ये ठिकाणी साजरा करायचा आणि तो Sea Lounge Restaurant , Taj Mahal Tower ( Hotel), Apollo Bandar, Colaba, Mumbai येथे केला आणि खूप वर्षांच स्वप्नं साकार झाल.
एकच सांगतो " स्वप्नं बघायला पैसै लागत नाहीत आणि स्वप्नं ही नेहमी मोठी पाहावीत आणि त्यासाठी कष्टाची तयारी असावी आणि सतत काहीतरी नावीन्यतेचा स्वीकार करून आपल काम कराव, यश तुमची वाट पाहत आहे"
© सागर शेडगे ( Founder and CEO BreakComfort ® Business Registration Services)
संपर्क क्रमांक - 9867008910
Comments
Post a Comment