माझे हॉटेल ताज महाल, मुंबई ला जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले १५ वर्षांनी ........
नमस्कार मित्रांनो, आज मी कोणतीही बिझनेस मार्केटींग पोस्ट करणार नाही. आज थोड माझ्याबद्दल बोलणार आहे, मी सागर शेडगे माझ मूळ गाव सातारा जन्म ही साताऱ्यातील , सातारा जिल्ह्यातील कास पठार भागातील "आंबाणी" हे आमचे छोटेसे २०० ते २५० लोकवस्तीचे गाव अत्यंत दुर्गम डोंगर भागातील आमच्या परिसरातील लोकांना ठोस अस उत्पन्नाच साधन नसल्यामुळे आणि शेती मर्यादित पारंपारिक पध्दतीने काही ठराविक पिके गरजेपुरती घेणे आणि बाकी छोटी मोठी कामे करून साताऱ्यातून गरजेच्या वस्तू विकत घेणे हा पर्याय. त्याकाळी शिक्षण ही जास्त नसल्यामुळे लोकांचा ओढा मुंबई कडे , १९७० च्या दशकात लोकांचे स्थलांतर झाले. त्यातील आमच ही कुटुंब होत वडील सातवीला असताना दिवसा काम रात्री शाळा अस करत १० वी पर्यंत शिकले, १९९६ ला त्यांनी मुंबईच्या कांदिवली उपनगरात चाळीमध्ये खोली घेतली. त्यांचा लहानपणापासुन संघर्ष पाहत होतो. नेहमी वाटत होत ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे, स्वप्नं नेहमी मोठी पहायचो. असच शिक्षण चालू असताना गाडी धुण्यापासून ११वी ला असताना कामाला सुरवात केली...