महात्मा फुले उद्योजक
महात्मा जोतिबा फुले एक उद्योजक (First Entrepreneur in Maharashtra) अज्ञात पैलू... १) उद्योजक महात्मा फुले- फार कमी जणांना ठावूक आहे, महात्मा फुले एक बांधकाम व्यावसायिक होते त्यांची The Puna Commercial and Contracting Company नावाची कंपनी होती पुण्यात जी कामगार पुरवणे, बांधकाम साहित्य पुरवठा करणे, नवीन बांधकाम करणे पुल, इमारत, रस्ते, उद्यान, धरण, कालवे , कापडगिरण्याअशी काम करायची. महात्मा फुले यांच्या कंपनीने पुढील कामे केली : • बंड गार्डन पुल, कात्रज बोगदा चुना व इतर बांधकाम साहित्य पुरवणे, कामगार पुरवणे अशी Subcontractor म्हणून कामे केली, खडकवास धरण ते घोरपडे उद्यान असे कॅनाल बनवले त्या काळी साठवलेले पाणी लोक वापरात नसत महात्मा फुलेंनी हडपसर ला जमीन घेवून ते पाणी वापरले व १ यशस्वी बागायतदार झाले, मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग, मुंबई महानरपालिका इमारत, भायखळा पुल, परळ रेल्वे वर्कशॉप, भंडारदरा जलाशय, सयाजीराव गायकवाड यांच्या लक्ष्मीविलास राजवाडा याच बांधकाम त्यांच्या कंपनीने केली व तसेच त्यांचे स्नेही व भागीदार यांनी टाइम्स ऑफ इंडिया ची मुंबई मधील बिल्डिंग, सोलापूरची...