ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी ब्रॅंड चे नाव कसे निवडावे?
ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी ब्रॅंड चे नाव कसे निवडावे? १) तो जर शब्द असेल तर शब्दलेखन करणे, बोलणे आणि लक्षात ठेवणे सोपे आहे असा शब्द निवडा. २) सर्वोत्कृष्ट ट्रेडमार्क म्हणजे नवीन बनवलेला शब्द, असा शब्द जो प्रथमच: उच्चारलेला गेला आहे. जस आविष्कृत शब्द असे शब्द आहेत, जे तुमच्या ट्रेडमार्क व्यतिरिक्त कोणत्याही भाषेत अस्तित्वात नाहीत. उदाहरणांमध्ये SPANDEX, EXXON, KODAK, VIAGRA, BREAKCOMFORT, OPLUS, HUNAAR, RAGDOLL, DIN SQUARE, KALPMEY, HOUSE OF SHAAROM, TERTHKSHETRA, DELL, FACEBOOK, GOOGLE दोन वेगळ्या शब्दांना एकत्र जोडून एक अर्थ निघेल त्याचा असा शब्द बनवा जो तुमच्या व्यवसायाच प्रतिनिधित्व करेल ओळख दाखवेल. आविष्कृत शब्द हा एक चांगला पर्याय आहे कारण ते अगदी विशिष्ट असतात. तुम्ही फक्त इतर शब्दांचे भाग एकत्र करून एक आविष्कृत शब्द तयार करू शकता. उदाहरणार्थ, MICROSOFT हे “Micro computer” आणि “software” चे संयोजन आहे किंवा अद्वितीय भौमितिक रचना (UNIQUE LOGO) जे तुमच्या ब्रँडची एक वेगळी ओळख निर्माण करतो. ३)कृपया भौगोलिक नाव, सामान्य वैयक्तिक नाव किंवा आडनाव निवडणे टाळा, त्यावर कोणाची मक्तेदा...